प्रधानमंत्री आवास प्लस योजना 2025 – लाभार्थी यादी संपूर्ण माहिती
"आपले नाव आवास प्लस यादीत आहे का? लगेच तपासा!"
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 2024 साठी अवास प्लस यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी त्या नागरिकांसाठी आहे, ज्यांना पूर्वीच्या घरकुल योजनांमधून घर मिळालेले नाही. सरकारने ही नवीन यादी 2024 मध्ये अपडेट करून प्रसिद्ध केली आहे.
यादी म्हणजे काय?
अवास प्लस यादी म्हणजे अशा लाभार्थ्यांची नावे जी 2011 च्या सामाजिक-आर्थिक जनगणना (SECC) नुसार पात्र आहेत, आणि ज्यांना अजून घर मिळालेले नाही. केंद्र सरकारने ग्रामपंचायत/नगरपरिषदेच्या मदतीने ही यादी तयार केली आहे.
यादीत कोणाचा समावेश केला जातो?
✅ ज्यांचं नाव आधी PMAY योजनेत नव्हतं
✅ कच्च्या घरात राहणारे
✅ बेघर कुटुंब
✅ वयोवृद्ध, अपंग, विधवा, अनुसूचित जाती/जमाती
✅ उत्पन्न कमी असलेले कुटुंब
✅ 2011 च्या SECC यादीत नाव असलेले
यादी कशी तपासायची?
तुमचं नाव यादीत आहे का हे पाहण्यासाठी:
ऑनलाईन प्रक्रिया (ग्रामीण योजनेसाठी): क्लिक करा
मेनू मधून "Stakeholders" → "IAY/PMAYG Beneficiary" वर क्लिक करा
आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा PMAY ID टाका
यादीत नाव दिसल्यास तुम्ही पात्र आहात
"Search Beneficiary" वर क्लिक करा
आधार क्रमांक टाकून यादीत नाव तपासा
यादीत नाव नसेल तर काय करावं?
आपल्या ग्रामसेवक, सरपंच, नगरसेवक किंवा स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क करा
नविन पात्र लाभार्थींची यादी तयार होण्याच्या वेळी आपली माहिती द्या
काही राज्यांमध्ये मोबाइल अॅप किंवा सर्वे टीम द्वारेही नोंद केली जाते
यादीतील नाव असल्यास पुढे काय?
✅ तुम्ही PMAY योजनेसाठी पात्र आहात
✅ पुढील टप्प्यात तुमच्याकडून कागदपत्रे मागवली जातील
✅ घर बांधकामासाठी निधी टप्प्याटप्प्याने दिला जाईल
✅ शौचालयासाठी वेगळा निधी दिला जातो
✅ स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात राहा

0 टिप्पण्या